चोपडा:- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला शास्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 चे आयोजन दिनांक 31 जानेवारी आणि 01 फेब्रुवारी 2023 या दोन दिवस आयोजित करण्यात आलेले होते यात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते 01 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी क्रिकेट सामना शिक्षक आणि शिक्षकेत्तर् साठी आयोजित केली होती यात कनिष्ठ शिक्षक संघ, शिक्षकेत्तर् संघ, वरिष्ठ शिक्षक संघ असे तीन संघ सहभागी झाले होते पहिल्या सामन्यात शिक्षकेत्तर् संघाने कनिष्ट संघाचा दारुण पराभव केला तर शिक्षकेत्तर् संघ आणि वरिष्ठ शिक्षक संघ यात अंतिम सामना खेळविला गेला यात वरिष्ठ शिक्षक संघाने 113 धावाचे लक्ष्य शिक्षकेत्तर् संघास देण्यात आले तर शिक्षकेत्तर संघ फक्त 60 धावा करून शकला या अंतिम सामन्यातप्रा. प्रतिम पाटील यांना सामनावीर घोषित करण्यात आले.