(सांस्कृतिक व विनोदी कार्यक्रमाला रसिकांचा लाभला भरघोस प्रतिसाद)
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आज दि.३१ जानेवारी २०२३ रोजी आयोजित 'वार्षिक स्नेहसंमेलनाचे' उदघाटन नंदुरबार येथील अहिराणी विनोदी लोककलाकार विजय पवार यांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष आशाताई विजय पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य गोविंद बापू महाजन, हरताळकर हॉस्पिटलचे सर्जन डॉ. विनीत हरताळकर व रेडिओलॉजिस्ट डॉ.नीता हरताळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य बी.एस.हळपे, पर्यवेक्षक एस.पी.पाटील तसेच स्नेहसंमेलन प्रमुख डी.पी.सपकाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय डी.एस.पाटील यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख डी.पी.सपकाळे यांनी केले.याप्रसंगी नंदुरबार येथील अहिराणी विनोदी लोककलाकार विजय पवार यांनी स्वतःच्या जीवनातील प्रसंगांचे अहिराणी बोलीतून विनोदी पद्धतीने कथन केले.कोरोना काळातील भयानक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने भाष्य केले तसेच मोबाईलमुळे घडणारे विनोद यांचे नाट्यमय सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले की, 'आपल्या माय बापाची किंमत अनमोल आहे. आपला भाऊ, मायबाप, नातेवाईक यांची मान खाली जाणार नाही,याची काळजी आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे.विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक माहितीसाठी करावा.आपले पाऊल वाकडे पडू देऊ नका.वाढलेली व्यसनाधीनता याबाबत सतर्क राहिले पाहिजे.जीवाला हसवा, हसत रहा व हसवत राहा, अहिराणीचा प्रचार व प्रसार करा तिचे संवर्धन करा'.या विनोदी अहिराणी कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शैलेश कुमार वाघ यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख व पर्यवेक्षक एस.पी. पाटील यांनी मानले.
याप्रसंगी मेहंदी, रांगोळी व पाककला तसेच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. रांगोळी,पाककला व मेहंदी या स्पर्धांचे उदघाटन हरताळकर हॉस्पिटलचे सर्जन डॉ. विनीत हरताळकर व हरताळकर हॉस्पिटलच्या रेडिओलॉजिस्ट डॉ.नीता हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले.वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव दूनगहू यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. अंगभूत कला गुणांचा विकास करावा. समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा.'
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात नाटिका, पथनाट्य, एकल नृत्य, समूह नृत्य, आदिवासी नृत्य, कॉमेडी शो,सुगम गायन, समूह गायन, गीत गायन इत्यादी कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी उत्साहात सादरीकरण केले.रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख डॉ.बी.एम. सपकाळ, व्ही.डी.शिंदे, आर.आर. बडगुजर यांनी केले.