चोपडा : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्यातील नवनिर्मितीक्षमता वाढीस लागावी तसेच संशोधकवृत्ती वृद्धिंगत होऊन नवसंशोधक निर्माण व्हावेत या उद्देशाने दि.०५ डिसेंबर २०२४ रोजी 'जिल्हास्तरीय अविष्कार २०२४ स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत हुम्यानिटीज, लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्स, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्सेस, ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिसिन अँड फार्मसी अशा एकूण सहा विभागांमधील पदवी, पदव्युत्तर तसेच पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांसाठी अविष्कार (पोस्टर व मॉड्युल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी दि. २८ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढविली असून https://nmu.ac.in/en-us/student-corner/Avishkar या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करता येईल.
तरी जळगाव जिल्हा परिक्षेत्रातील संस्था व महाविद्यालयांनी या अविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अविष्कार स्पर्धेचे स्थानिक सल्लागार समितीप्रमुख व प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम. पाटील तसेच अविष्कार संयोजन समितीचे प्रमुख व समन्वयक डॉ.व्ही.आर.हुसे व डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी ८६९८१५१५४३ व ९४२१८५१९४१ या नंबर संपर्क साधावा.