चोपडा:
कठोर परिश्रम व प्रतिकूल परिस्थिती यांच्याशी संघर्ष करून यशाचे फळ चाखता येते, असे मत पो.नि.सावळे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात आज दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित 'वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना चोपडा शहर पो.स्टे.पो. नि.अजित सावळे पुढे म्हणाले की,अलीकडची पिढी प्रेमातील पावित्र्य गमावणार की काय? अशी भीती आहे. प्रेम केवळ शारीरिक आकर्षणाची बाब नसून,अत्यंत पवित्र संकल्पना आहे. ती जपली पाहिजे!
या कार्यक्रमाप्रसंगी अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी मंडळ सदस्य सुरेश पाटील,गव्हर्निंग कॉन्सिलचे सदस्य जयवंत पाटील, यशवंत खैरनार व विश्वस्त डॉ.अशोक कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते मेहंदी, रांगोळी, पाककला, आनंद मेळावा, विविध खेळ व नाटिका, पथनाट्य, एकल नृत्य, समूह नृत्य, आदिवासी नृत्य, कॉमेडी शो,सुगम गायन, समूह गायन, गीत गायन, शेला पागोटे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेत विजेत्या वरीष्ठ महाविद्यालयीन संघास व उपविजेत्या शिक्षकेत्तर कर्मचारी संघास तर प्रतिक पाटील याना 'मॅन ऑफ दी मॅच' म्हणून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी स्वयंसेवकांचाही गौरव झाला.
अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील यांनी केले.परिचय डॉ.ए.बी.सूर्यवंशी यांनी करून दिला तर सूत्रसंचलन प्रा.संदीप पाटील व डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले.
प्रा.डी.पी.सपकाळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी व प्रा.बी.एस.हळपे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समिती प्रमुख, सदस्य, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.