चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २०२३ यावर्षी राज्यातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केले. यात विशेष बाब म्हणजे महाविद्यालयातील एकूण २१ विद्यार्थ्यांची यामध्ये निवड झाली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे माळी सोनाली काशिनाथ या विद्यार्थिनीने महिला गटामध्ये सर्वात प्रथम क्रमांक पटकाविला.
संस्थेच्या वतीने या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव सोहळा' आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मा.उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या मा.सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी संस्थेच्या, महाविद्यालयाचा तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाचा आढावा घेतला.
यावेळी सचिन रवींद्र पाटील व सचिन वासुदेव पाटील या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 'संस्थेने व महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या प्रशस्त मैदान तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आज आम्ही यशस्वी होऊ शकल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी सचिन रवींद्र पाटील, विशाल नामदेव धनगर, मयूर अरुण बाविस्कर, पवन प्रभाकर पाटील, जगदीश राजू महाजन, सचिन वासुदेव पाटील, विशाल अशोक घिसाळी, हर्षल प्रभाकर सोनवणे, कल्पेश बबन पाटील, रवींद्र लादु कोळी, किरण नवल वाघ, भूषण अशोक महाजन, जितेंद्र तुकाराम पाटील, राहुल निकम, सागर राजेंद्र पाटील, रामेश्वर बाबूलाल कोळी, मयूर विजय कोळी, दिनेश अशोक बाविस्कर, राजेंद्र लहू कोळी इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रशिक्षणासाठी जिमखाना विभाग प्रमुख सौ. क्रांती क्षीरसागर, करिअर कट्टा समन्वयक वाय.एन.पाटील, स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख डॉ.आर.आर.पाटील, पोलीस भरती समन्वयक संदीप भास्कर देवरे, यांचे मार्गदर्शन लाभले व रवींद्र पाटील, सुधाकर बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.आर. पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती क्रांती क्षीरसागर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.ए.बी. सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.