चोपडा:- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या रसायन शास्त्र विभाग आणि ट्रेनिंग प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ मार्च २०२३ रोजी मंगला इंडस्ट्रीज, देवास च्या संचालिका व महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी श्रीमती अमिती अग्रवाल यांनी तृतीय वर्ष रसायन शास्त्र विभागातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले त्यांनी रसायन शास्त्र विषयाचे इंडस्ट्रीज मधील महत्व विषद केले. मंगला इंडस्ट्रीज मध्ये विविध नामांकित कंपनीचे लागणारे साहित्य निर्माण केले जाते त्यासाठी विविध पार्ट तयार करण्यासाठी फौंडरी चा उपयोग केला जातो त्याकरिता रसायन शास्त्र विषयाची तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची गरज असते या कार्यक्रमात विद्यार्थीचे अनेक शंकाचे निरसन श्रीमती अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, शास्त्र विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एम. जी. पाटील, डॉ. पी. के. लभाणे, डॉ. के. एस. भावसार, डॉ. एस. आर पाटील कनिष्ट विभागाचे श्री. अतुल आर. पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयुर पाटील तर आभार डॉ. बी. एम. सपकाळ यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी श्री. जी. एम. राठोड यांचे सहकार्य लाभले यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.